इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिकांचा विशेषतः झी मराठीवरील मालिकांचा एक विशिष्ट असा प्रेक्षकवर्ग असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या मालिकांमधील विषय आणि त्याचे दर्जेदार सादरीकरण. यामुळेच झी मराठीवरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत असते. आणि म्हणूनच सातत्याने नवनवीन मालिका छोट्या पडद्यावर येत असतात. नवीन मालिका आल्या की जुन्या मालिकांना निरोप देणे ओघाने आलेच. ‘झी मराठी’वरील अशीच एक मालिका आता निरोप घेणार असल्याचे सांगण्यात आले. ही मालिका दुसरी तुसरी कुणी नसून अतिशय लोकप्रिय आणि गोड अशा परीची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड आग्रहास्तव अखेर ही मालिका बंद न करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. मात्र, या मालिकेत थोडासा बदल झाला आहे. ही मालिका आता प्रेक्षकांना दररोज सायंकाळी साडेसहा वाजता पहायला मिळणार आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1570416704454553601?s=20&t=EQ5SC20tCfhzjYS7DRxZ4w
छोट्या पडद्यावरील या मालिकांचा एक ठरावीक प्रेक्षकवर्ग असतो. हे चाहते या मालिकांवर नितांत प्रेम करतात. त्यामुळेच त्यातील भूमिका चाहते समरसून जगतात. यातील भूमिकांवर जेवढं प्रेम करतात, तेवढीच त्यावर टीका करतात, संताप व्यक्त करतात. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका संपत असल्याने चाहते नाराज झाले. त्याची दखल निर्मात्यांना घ्यावा लागला आहे. त्यामुळेच ही मालिका १९ सप्टेंबरपासून आता प्रेक्षकांना नव्या वेळेत पाहता येणार आहे. तर, या मालिकेच्या जागी म्हणजे रात्री साडेआठ वाजता दार उघड बये ही नवी मालिका सुरू होत आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1570653862973022208?s=20&t=EQ5SC20tCfhzjYS7DRxZ4w
झी मराठीवर नुकत्याच दोन मालिका सुरू झाल्या आहेत. त्यात ‘तू चाल पुढं’ आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’ यांचा समावेश आहे. तर, ‘दार उघड बये’ आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या दोन मालिका सुरू होत आहेत. माझी तुझी रेशीमगाठ’ ही लोकप्रिय मालिका १८ सप्टेंबरला संपणार असल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला. ही मालिका चांगली सुरू आहे, ती प्लिज बंद करू नका, मस्त मालिका आहे, अशीच चालू ठेवा, अशी विनंती प्रेक्षक करत होते. त्याची दखल अखेर घेण्यात आली आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1570728968357294080?s=20&t=EQ5SC20tCfhzjYS7DRxZ4w
Marathi TV Serial Majhi Tujhi Reshimgath New Change
Zee Marathi Entertainment Shreyas Talpade Prarthana Behere Pari