India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

परीच्या मालिकेबाबत निर्मात्यांनी केली ही मोठी घोषणा; प्रेक्षकांच्या आग्रहामुळे निर्णय

India Darpan by India Darpan
September 16, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिकांचा विशेषतः झी मराठीवरील मालिकांचा एक विशिष्ट असा प्रेक्षकवर्ग असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या मालिकांमधील विषय आणि त्याचे दर्जेदार सादरीकरण. यामुळेच झी मराठीवरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत असते. आणि म्हणूनच सातत्याने नवनवीन मालिका छोट्या पडद्यावर येत असतात. नवीन मालिका आल्या की जुन्या मालिकांना निरोप देणे ओघाने आलेच. ‘झी मराठी’वरील अशीच एक मालिका आता निरोप घेणार असल्याचे सांगण्यात आले. ही मालिका दुसरी तुसरी कुणी नसून अतिशय लोकप्रिय आणि गोड अशा परीची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड आग्रहास्तव अखेर ही मालिका बंद न करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. मात्र, या मालिकेत थोडासा बदल झाला आहे. ही मालिका आता प्रेक्षकांना दररोज सायंकाळी साडेसहा वाजता पहायला मिळणार आहे.

ही रेशीमगाठ तुटायची नाय …. #MajhiTujhiReshimgath #ZeeMarathi
आपल्या आवडत्या शोजचे पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी https://t.co/9q8IXxYaSG या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करा Zee5 ॲप. pic.twitter.com/UMSs3PLTwj

— Zee Marathi (@zeemarathi) September 15, 2022

छोट्या पडद्यावरील या मालिकांचा एक ठरावीक प्रेक्षकवर्ग असतो. हे चाहते या मालिकांवर नितांत प्रेम करतात. त्यामुळेच त्यातील भूमिका चाहते समरसून जगतात. यातील भूमिकांवर जेवढं प्रेम करतात, तेवढीच त्यावर टीका करतात, संताप व्यक्त करतात. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका संपत असल्याने चाहते नाराज झाले. त्याची दखल निर्मात्यांना घ्यावा लागला आहे. त्यामुळेच ही मालिका १९ सप्टेंबरपासून आता प्रेक्षकांना नव्या वेळेत पाहता येणार आहे. तर, या मालिकेच्या जागी म्हणजे रात्री साडेआठ वाजता दार उघड बये ही नवी मालिका सुरू होत आहे.

ही रेशीमगाठ सुटायची नाय…#majhitujhireshimgath #zeemarathi #MumbaiRains pic.twitter.com/6NwHVXgEwa

— Zee Marathi (@zeemarathi) September 16, 2022

झी मराठीवर नुकत्याच दोन मालिका सुरू झाल्या आहेत. त्यात ‘तू चाल पुढं’ आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’ यांचा समावेश आहे. तर, ‘दार उघड बये’ आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या दोन मालिका सुरू होत आहेत. माझी तुझी रेशीमगाठ’ ही लोकप्रिय मालिका १८ सप्टेंबरला संपणार असल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला. ही मालिका चांगली सुरू आहे, ती प्लिज बंद करू नका, मस्त मालिका आहे, अशीच चालू ठेवा, अशी विनंती प्रेक्षक करत होते. त्याची दखल अखेर घेण्यात आली आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका येतेय तुमच्या भेटीला एका नव्या वेळेत.
19 सप्टेंबरपासून सोम ते शनि, संध्या. 6.30#MajhiTujhiReshimgath #ZeeMarathi
आपल्या आवडत्या शोजचे पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी https://t.co/9q8IXxYaSG या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करा Zee5 ॲप. pic.twitter.com/P8mW2AKiMp

— Zee Marathi (@zeemarathi) September 16, 2022

Marathi TV Serial Majhi Tujhi Reshimgath New Change
Zee Marathi Entertainment Shreyas Talpade Prarthana Behere Pari


Previous Post

पुणेकरांना दिलासा! पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल सेवेत; हिंजवडी आयटी पार्क व मुळशीकडे जाणाऱ्यांना फायदा

Next Post

चोरट्यांचा मोर्चा मंदिराकडे! जालन्यापाठोपाठ धुळ्यात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरीला

Next Post

चोरट्यांचा मोर्चा मंदिराकडे! जालन्यापाठोपाठ धुळ्यात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरीला

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group