India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मराठी मालिकेतील फेमस या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा; हा आहे तिचा नवरा

India Darpan by India Darpan
January 8, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या मराठी मनोरंजन विश्वात लग्नसराईचा मौसम सुरू आहे. अक्षया देवधर – हार्दिक जोशी यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील शशांकचा साखरपुडा झाला. थोडक्यात, अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत.

‘स्टार प्रवाह’ मालिकेवरील सर्वच मालिका या प्रेक्षणाच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. यातील बहुतेक मालिका टीआरपीच्या कक्षेत आपले स्थान टिकवून आहेत. यातीलच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’. एका अपघाताने झालेला विवाह हा पुढे कसा प्रेमकहाणीत बदलतो. बायकोच्या स्वप्नांसाठी तिच्या मागे भक्कमपणे उभा राहणार नवरा हे या मालिकेचे ढोबळ मानाने कथानक. अल्पावधीत ही मालिका लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. मालिकेतील कीर्तीच्या ट्रेनिंग ट्रॅकने तर भरपूर लोकप्रियता मिळवली होती.

View this post on Instagram

A post shared by Bhumija Patil (@bhumija_arvind_patil)

नुकताच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका बंद झाली असली तरी मालिकेतील कलाकार आजही तितकेच लोकप्रिय आहेत. मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्न समारंभ जोरात सुरू आहेत. नुकताच या मालिकेतील एका अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील जान्हवीची भूमिका अभिनेत्री भूमिजा पाटीलने साकारली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. भूमिजाचा नुकताच साखरपुडा झाला आहे. भूमिजाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केले आहेत. ही बातमी येताच अभिनेत्रीवर शुभेच्छाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

भूमिजाचा साखरपुडा अगदी शाही थाटात पार पाडला. यावेळी इंडस्ट्रीतील तिचे काही खास मित्र उपस्थित होते. हिरव्या रंगाच्या साडीत भूमिजा खूप सुंदर दिसत होती. भूमिजा पाटीलच्या होणाऱ्या नवराचे नाव पराग आहे. अभिनेत्रीने परागसोबत आपले दुबई ट्रिपचे फोटोसुद्धा याआधी शेअर केले होते. पराग हा जिम ट्रेनर आहे. भूमिजा सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना फारच पसंत पडत आहे.

Marathi TV Serial Actress Bhumija Patil Engaged


Previous Post

सावधान! हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबाचा विळखा घट्ट होतोय; बघा, तज्ज्ञ काय म्हणताय

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group