India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

यंदाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये? हालचालींना वेग

India Darpan by India Darpan
March 31, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. एक संमेलन आटोपले की लगेच दुसऱ्या संमेलनाच्या स्थळाची चर्चा सुरू होते. वर्धा येथील संमेलन आटोपून दोन महिनेही व्हायचे असताना आता पुढील संमेलनाचा विषय अजेंड्यावर आला आहे. यंदाचे संमेलन अमळनेर येथे होण्याची शक्यता आहे. येत्या २३ एप्रिलला यासंदर्भात निर्णय होणार आहे.

वर्धा येथे ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आले. त्यामुळे आता पुढील साहित्य संमेलन ९७वे असेल. या संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (जि. सांगली) अश्या दोन ठिकाणांचे प्रस्ताव आले आहेत. तर खानदेशातील जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातून एक प्रस्ताव आला आहे. तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील प्रस्ताव संमेलनस्थळाच्या यजमानपदासाठी आला आहे.

या तिन्ही स्थळांची पाहणी होऊन २३ एप्रिलला पुण्यात स्थळाची घोषणा करण्यात येईल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक २३ एप्रिलला पुण्यात होणार आहे. यावेळी सर्व पाहणी अहवालांवर चर्चा होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती बैठकीपूर्वी सर्व चारही स्थळांना भेट देणार आहे, अशी माहिती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

मराठवाड्याची शक्यता कमीच?
कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर मराठवाड्यातील उदगीर तालुक्यात गेल्यावर्षी ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यामुळे लगेच दोन वर्षांत मराठवाड्याला यजमानपद मिळण्याची शक्यता कमीच आहे. अशात महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखा (सातारा), औदुंबर साहित्य मंडळ (सांगली) आणि मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर (जळगाव) ही तीन स्थळे स्पर्धेत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अध्यक्षपदाची चर्चाही सुरू होणार
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाल्यानंतर लगेच अध्यक्षपदाच्या दावेदाराची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण संमेलनस्थळ निश्चित झाल्यावर अध्यक्षपदासाठी नावांचे प्रस्ताव मागविले जाणार. त्यानंतर काही महिन्यांनी अध्यक्षाचे नाव घोषित होणार. त्यामुळे अद्याप तरी संमेलस्थळावरच सारे काही अवलंबून आहे.

Marathi Sahitya Sammelan Amalner Possibility


Previous Post

एकरी १० लाखांचे उत्पन्न घेतायेतं तरूण शेतकरी! गटशेतीमुळे तरूणांच्या जीवनमानात कायापालट

Next Post

भाजप आमदारांचा कारभार कसा आहे? पक्षाने केले सर्वेक्षण… असा आहे त्याचा निष्कर्ष…

Next Post

भाजप आमदारांचा कारभार कसा आहे? पक्षाने केले सर्वेक्षण... असा आहे त्याचा निष्कर्ष...

ताज्या बातम्या

श्री तुळजाभवानी देवीची मौल्यवान नाणी गायब असताना मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याच्या हालचाली

June 7, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

June 7, 2023

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group