India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘पिकोलो’ २६ जानेवारीपासून चित्रपटगृहात; असे आहे त्याचे वैशिष्ट्य (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
January 19, 2023
in मनोरंजन
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनोरंजनाची चौकट न मोडताही आशयपूर्ण आणि जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत. ‘पिकोलो’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ‘संगीतमय’ चित्रचौकटीतून एका कलावंताच्या भावविश्वाचा प्रवास सुरेखरित्या उलगडण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारील ‘पिकोलो’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जगण्याची प्रेरणा देणारा आशय सुंदर कथा, अभिनयाने मोहून टाकणारे निरागस चेहरे आणि त्याला सुश्राव्य संगीताची जोड या सगळ्याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे ‘पिकोलो’ चित्रपट, फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा.लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘पिकोलो’ चित्रपटाची निर्मिती राजेश मुद्दापूर यांनी केली आहे.

‘पिकोलो’ संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? है ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे पहाणं रंजक ठरणार आहे.

प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असूनया दोघांसोबत पिकोलो चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर के झेंडे आहेत. चित्रपटाचे वितरण फिल्मास्त्र स्टुडिओ करीत आहे. येत्या २६ जानेवारीला ‘पिकोलो’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Marathi Movie Pikolo from 26 January in Theatre


Previous Post

शौर्यपदक विजेते मेजर साकलकर यांना ६ लाख तर गृहरक्षक दलाच्या जवानास २५ लाख रुपये

Next Post

कोल्हापूर चित्रनगरीबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांची मोठी घोषणा

Next Post

कोल्हापूर चित्रनगरीबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group