इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्याकडे सगळे असूनही सतत रडत बसण्याची किंवा दुसऱ्यासोबत तुलना करून दुःखी राहण्याची अनेकांची मानसिकता असते. अशीच मानसिकता असलेल्यांना अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने चपराक लगावली आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर अभिनेत्री म्हणून प्रार्थना ओळखली जाते. यासोबतच ती स्पष्टवक्ता म्हणूनही ओळखली जाते. मालिका तसेच चित्रपटांमुळे ती घराघरात पोहोचली आणि तिचे चाहते देखील बरेच आहेत. झी मराठीवरील नुकत्याच संपलेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत ती झळकली होती. मालिकेतील श्रेयस तळपदे सोबतच्या तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. प्रेक्षकांना देखील यांच्यातील केमिस्ट्री आवडली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेला आणि मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहे. अशी ही प्रार्थना सध्या चर्चेत आहे ती, तिने केलेल्या एका पोस्टमुळे. इन्स्टाग्रामवर तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
आयुष्याचे सांगितले तत्त्वज्ञान
प्रार्थनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आयुष्याचे सार सांगितले आहे. प्रार्थना म्हणते, “तुम्ही आता इथे श्वास घेत असताना, दुसरीकडे एखादी व्यक्ती शेवटचा श्वास घेत असते. त्यामुळे सतत तक्रार करणे थांबवा आणि तुमच्याकडे जे आहे, त्यात आयुष्य जगायला शिका,” असा सल्ला प्रार्थना या पोस्टमधून देते.
Marathi Actress Prarthana Behere Post