इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठीतली आयटम गर्ल म्हणून ओळख असलेली मानसी नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या देखील नवऱ्यासोबत बिघडलेल्या संबंधांमुळे, नवऱ्याला घटस्फोट देण्याच्या चर्चेमुळे ती चर्चेत आहे.
‘बाई वाड्यावर’ या गाण्यातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक ही अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेत मानसी वेगळी होणार आहे. वैवाहिक आयुष्यात वादळ आल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं मानसीने सांगितलं होतं. तिने एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी मानसी नाईकचे कान उपटले आहेत.
नृत्यामध्ये आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी मानसी पोस्ट करत असते. इन्स्टाग्राम लाइव्ह आणि सोशल मीडियाद्वारे मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनेक फोटो व व्हिडीओही ती शेअर करताना दिसते. मानसीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. नथ घालून, चंद्रकोर लावून तिने पारंपरिक लूक केला आहे. या रील व्हिडीओमध्ये मानसी “जी बायको नवऱ्याला छळत नाही, तिला संसारातलं काही ढेकळं कळत नाही”, असं म्हणते आहे.
मानसीचा हे मजेशीर रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून मानसी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. यावर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘…आणि मग नवऱ्याला सोडते’. तर एका चाहत्याने मानसी अग एकदा लग्न झालं की संसारात भांडण तर होत असतातच, त्यातूनच संसार फुलतो ग नको वेगळं होऊस असा प्रेमळ सल्ला दिला आहे. मानसी आणि प्रदीप १९ जानेवारी २०२१ रोजी विवाहबद्ध झाले. प्रदीप हा पेशाने बॉक्सर असून तो मॉडेलिंग क्षेत्रातही त्याचं नशीब आजमावत आहे. घटस्फोटाच्या चर्चांनंतर मानसी आणि प्रदीपची सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जुगलबंदी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
Marathi Actress Mansi Naik Share Video