India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पुन्हा एका ऐतिहासिक भुमिकेत दिसणार अभिनेत्री अश्विनी महांगडे; शेअर केली ही पोस्ट

India Darpan by India Darpan
May 22, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘आई कुठे काय करते’ फेम अनघा म्हणजेच अश्विनी महांगडे ही एक गुणी अभिनेत्री आहे. तिच्या या भूमिकेचे तर कौतुक होतेच आहे, पण यापूर्वी तिने साकारलेल्या शिवकन्या राणू अक्का या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत तिने ही भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा अश्विनी एका ऐतिहासिक भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे. तिने स्वतःच सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक होते आहे.

अश्विनी तिच्या आगामी चित्रपटात अहिल्या बाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. याबाबत अश्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये चित्रपटाचे पोस्टर असून अहिल्याबाई होळकर यांच्या रुपात अश्विनी महांगडे दिसते आहे. सोबतच अश्विनीने एक खास कॅप्शनही दिले आहे.

अश्विनी म्हणते, ”इंदूर संस्थानचे संस्थापक, वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करते. आज अतिशय आनंदाची बातमी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. खूप मोठी जबाबदारी, मनावर दडपण आले असले तरी तितकाच आनंद होत आहे.” ”माझी प्रमुख भूमिका असलेला ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ या चित्रपटाची आज घोषणा झाली. रसिक मायबाप प्रेक्षकहो याही चित्रपटावर आपण प्रेम करावे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. ” अशा शब्दात अश्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आपले काम करत असताना सामाजिक भान जपणारी फार मोजकीच माणसे या क्षेत्रात आहेत. यात अश्विनीचा देखील समावेश होतो. ‘रयतेचे स्वराज्य’ या तिच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात सक्रिय असते. अश्विनी सोशल मीडियावर देखील लोकप्रिय असून, तिच्या कामाचे अनेक चाहते आहेत.

अश्विनीची मुख्य भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट आहे. यात अहिल्याबाई होळकर यांची भूमिका अश्विनीने साकारली आहे. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. अश्विनीचे चाहते तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अश्विनी ‘महाराष्ट्र शाहीर’ व्यतिरिक्त ‘बॉईज’ या चित्रपटातही झळकली आहे.

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

Marathi Actress Ashvini Mahangade New Historic Role


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

“माझा नवरा मुस्लिम असला तरी…” ‘केरळ स्टोरी’ बघून देवोलिना भट्टाचार्जीने दिली ही प्रतिक्रिया…

Next Post

"माझा नवरा मुस्लिम असला तरी..." 'केरळ स्टोरी' बघून देवोलिना भट्टाचार्जीने दिली ही प्रतिक्रिया...

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या! MHT CET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

June 9, 2023
सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group