इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काम कोणतेही असले तरी त्याला प्राधान्य असते. मनोरंजन विश्वात प्रेक्षकांचे मनोरंजन हे एका कलाकाराचे कर्तव्य असते. या सगळ्यात तब्येतीकडे दुर्लक्ष करणं भारी पडू शकते. याचा प्रत्यय नुकताच अभिनेता सागर कारंडेला आला आहे. अभिनेता सागर कारंडे हा विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने त्याला घराघरात पोहचवले. या कार्यक्रमासोबत तो थिएटरसुद्धा करतो आहे. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा प्रयोग करत असताना सागरला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते. या प्रसंगानंतर त्याने फेसबुकवर लाइव्ह येत आपल्या आरोग्याविषयी माहिती दिली आहे.
मिमिक्रीमध्ये हातखंडा असलेला विनोदी अभिनेता सागर कारंडे सध्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे नाटक करत आहे. २० नोव्हेंबरला त्याच्या या नाटकाचा मुंबई मराठी साहित्य संघात प्रयोग होता. या नाटकाच्या प्रयोगाआधी त्याच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सागरच्या प्रकृतीसंदर्भात चुकीची माहिती पसरवली जाऊ लागली. आता त्याची प्रकृती सुधारली असून त्याने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांना तब्येतीबाबत माहिती दिली आहे. सागर म्हणाला, २० नोव्हेंबरला आमच्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा प्रयोग होता. पण प्रयोगाआधी माझ्या छातीत दुखू लागलं, चक्कर आली. त्यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझ्या सर्व टेस्ट केल्या गेल्या. त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले. पण डॉक्टरांनी मला प्रवास करण्यास मनाई केली. त्यामुळे आमच्या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला.
‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे नाटक बुक असल्याने या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात येत नव्हता. ऐनवेळी सूत्रधार गोट्या सावंत यांनी ‘वासूची सासू’ या नाटकाचा प्रयोग होईल असं जाहीर केलं. यावेळी सागरने ‘वासूची सासू’ या नाटकाच्या टीमचे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आभार मानले. तशी पोस्ट देखील त्याने आपल्या फेसबुकवर केली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘फू बाई फू’ हे छोट्या पडद्यावरील दोन्ही कार्यक्रम सागर करत आहे. रंगभूमीवर ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे नाटक सुरू आहे. रात्री शूटिंग, नाटकाचे प्रयोग, प्रवास, वेळेवर न जेवणं असाच सागरचा सध्याचा दिनक्रम आहे. छातीत दुखायला लागलं त्यादिवशी त्याने काही खाल्लं नव्हतं. त्यामुळे अॅसिडीटी झाली आणि अॅसिडिटी झाल्याने त्याच्या छातीत दुखायला लागलं असं डॉक्टर म्हणाले. त्याच्या सर्व टेस्ट करण्यात आल्या असून रिपोर्ट्स नॉर्मल आहेत.
https://www.facebook.com/100000593713162/videos/3174675059511352/
Marathi Actor Sagar karande FB Live Health update
Entertainment