India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक महाराष्ट्रात

India Darpan by India Darpan
November 24, 2022
in राज्य
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असून गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होत नाही. हा आजार फक्त पशुधनामध्ये आढळत असून, राज्यात लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव कमी होत असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री.सिंह म्हणाले की, लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक राज्यात 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहे. रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले असल्यामुळे या दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

राज्यामध्ये आजअखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3712 संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 292205 बाधित पशुधनापैकी एकूण 2,14,071 पशुधन उपचाराने बरे झालेले आहेत. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 19,895 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 7,594 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी रु. 19.57 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 138.20 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार राज्यात सुमारे 98.77 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले.

Lumpi Skin Disease Central Government Team Maharashtra Tour


Previous Post

पशुपालकांनी जनावरांचे दूध काढताना घ्यावी ही काळजी; ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विजयकुमार तेवतिया यांचा सल्ला

Next Post

नाटकाच्या प्रयोगाआधीच कोसळला अभिनेता सागर कारंडे; अखेर व्हिडिओद्वारे दिली आरोग्याची माहिती

Next Post

नाटकाच्या प्रयोगाआधीच कोसळला अभिनेता सागर कारंडे; अखेर व्हिडिओद्वारे दिली आरोग्याची माहिती

ताज्या बातम्या

महारेराच्या अंमलबजावणीवर उठताहेत प्रश्न…बिल्डरांवर काही कारवाई होतेय का…

October 2, 2023

ग्रामीण विकास योजनांच्या निधीवरुन पश्चिम बंगाल व केंद्र सरकारमध्ये जुंपली, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

October 2, 2023

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर इतके लाख लेखापरीक्षण अहवाल दाखल, प्राप्तिकर विभागाने मानले आभार

October 2, 2023

खंडणी मागायला आले अन् जाळ्यात अडकले

October 2, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे, जाणून घ्या.. ३ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 2, 2023

येवल्यात मुसळधार पाऊस; दुकान व घरात पाणी शिरले, दुचाकी रस्त्यावर आडव्या झाल्या (बघा व्हिडिओ)

October 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group