बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता हा मराठी अभिनेता बांधणार लग्नगाठ; अशी आहे त्याची लव्हस्टोरी

by Gautam Sancheti
डिसेंबर 18, 2022 | 5:09 am
in मनोरंजन
0
Capture 18

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या लग्नसराई सुरू आहे. एकामागून एक लग्न सोहळे साजरे होत आहेत. अनेक अभिनेते, अभिनेत्री बोहल्यावर चढत असल्याचे चित्र आहे. नुकतेच अक्षया देवधर-हार्दिक जोशी, आशय कुलकर्णी – सानिया गोडबोले यांच्यानंतर नुकतंच ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ मालिकेतील बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेदेखील विवाहबंधनात अडकला आहे. त्यांच्या नंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत शशांकची भूमिका साकारणारा चेतन वडनेरे सुद्धा लवकरच लग्न करणार असल्याचे समजते आहे.

अभिनेता चेतन वडनेरे आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहे. आणि त्याने त्याचे हे नाते कधीच लपवून ठेवले नाही. अभिनेत्री ऋजुता धारप आणि चेतन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा ते एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. नुकतीच चेतनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत चेतन आणि ऋजुता दोघेही समुद्रकिनारी आहेत. त्याने आणि ऋजुताने हातात भेळ पकडलेली दिसत आहे आणि त्यावर ‘अँड काउंटडाउन बिगिन्स’, असे लिहिले आहे. चेतनच्या या पोस्टमुळे हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

चेतन मूळचा नाशिकचा असल्याने त्याने तिथेच शालेय तसेच पदवीचं शिक्षण घेतलं होतं. अभिनयाच्या ओढीने त्याची पावलं मुंबईकडे वळली. नाटक, एकांकिका गाजवत असताना त्याला स्टार प्रवाहवरील ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. तर मुंबईत जन्मलेली ऋतुजा हिने मुंबईत आपले शालेय व कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान एकांकिका स्पर्धेत यश मिळवले होते. त्यामुळे पुढे थिएटर करत असताना ‘फुलपाखरू’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. चेतन वडनेरे ‘फुलपाखरू’ या मालिकेत झळकला होता. याच मालिकेत ऋजुता देखील सहकलाकाराच्या भूमिकेत होती. ‘फुलपाखरू’च्या सेटवर चेतन आणि ऋजुता यांची भेट झाली होती. त्यानंतरच त्यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली असल्याचे समजते.

View this post on Instagram

A post shared by Poshaaq By Shweta Shinde ?? (@labelposhaaq09)

Marathi Actor Chetan Vadnere Will Marry Soon

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ! नामांकित निर्मात्यांच्या घर, कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

Next Post

अंजली अरोराने शूट केला बोल्ड व्हिडीओ; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Anjali Arora

अंजली अरोराने शूट केला बोल्ड व्हिडीओ; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011