मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाट्यगृहांच्या असुविधांबाबत सातत्याने नाट्यकर्मी बोलत असतात. राज्यातील विविध शहरांमध्ये नाट्यगृहांची अवस्था चांगली नाही. त्यासंदर्भात ओरड होत असुनही अद्याप त्यात सुधारणा झालेली नाही. अशात अभिनेता भरत जाधव यांनी रत्नागिरीत नाटकाच्या प्रयोगादरम्यान आलेल्या अनुभवावरून संताप व्यक्त करत पुन्हा येथे प्रयोग करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
भरत जाधव यांच्या ‘तू तू मी मी’ या नाटाकाचा रत्नागिरीत प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगादरम्यान एसी आणि साऊंड सिस्टीम नसल्यामुळे भरत जाधव नाराज झाला. रत्नागिरीच्या प्रयोगादरम्यानच्या व्हायरल व्हिडीओमध्ये भरत जाधव म्हणाला की,‘एसी नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा. तुम्ही प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता?’ त्यानंतर प्रेक्षकांची माफी मागत हात जोडत ते म्हणाले की,‘मी पुन्हा रत्नागिरीत प्रयोग करणार नाही.’ शनिवारी रत्नागिरीच्या नाट्यगृहात ‘तू तू मी मी’ या नाटकाचा रात्री 10 वाजता प्रयोग होता. प्रचंड उकाड्यात हा प्रयोग सुरू झाला.
दरम्यान नाट्यगृहातील एसी बंद होता. तसेच फॅनदेखील नव्हते. नाट्यगृहाची स्वतःची साऊंड सिस्टिम नसल्याने कलाकारांना त्रास सहन करावा लागला आहे. तसेच प्रेक्षकांना देखील प्रचंड उकाड्यात हे नाटक पाहावं लागलं. भरत जाधव यांनी याआधीदेखील ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील भोंगळ कारभार आणि दुरावस्थेबद्दल संपात व्यक्त केला होता.
https://twitter.com/News18lokmat/status/1660175789407576070?s=20
वैभव मांगलेनेही व्यक्त केली होती नाराजी
काही दिवसांपूर्वीच अभिनेता वैभव मांगलेनेदेखील नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल खास पोस्ट लिहिली होती. त्याने लिहिले होते,‘नाशिकच्या नाट्यगृहातील एकाही ठिकाणाची वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात प्रयोग पाहत होते.’
Marathi Actor Bharat Jadhav Big Announcement Drama