गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मोठा निर्णय; छत्रपती संभाजी राजे यांनी केली ही घोषणा (व्हिडिओ)

by India Darpan
जून 21, 2021 | 6:29 am
in मुख्य बातमी
0
IMG 20210621 WA0117 e1624255264789

विशेष प्रतिनिधी, नाशिक
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या बैठकीत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. आमच्या मागण्यांसाठी सरकारने २१ दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यामुळे मूक आंदोलन आम्ही १ महिने पुढे ढकलत आहोत. सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अतिशय उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा आंदोलक समन्वय समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याचे राजेंनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत काय निर्णय झाले, मराठा आरक्षणाबाबत प्रशासकीय पातळीवर काय कार्यवाही केली जात आहे. यासह विविध प्रकारची विस्तृत माहिती राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर प्रलंबित मागण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यव्यापी मूक मोर्चा आंदोलन आज नाशिक येथे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाजवळील मैदानावर झाले. या आंदोलनासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती नाशिकमध्ये रविवारी सायंकाळी दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन सुरु झाले. या आंदोलनात पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे. विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह खासदार, आमदार यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.
सकाळपासून सुरु असलेल्या या आंदोलनासाठी काळा शर्ट, तोंडाला काळा मास्क परिधान करुन आंदोलक सामील झाले. तर काही जण काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी झाले. मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा नाशिकला ठरवू असे संभाजीराजे यांनी सांगितले होते. त्यामुळे नाशिकच्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाबरोबरच नाशिकमध्ये राज्यभरातील समन्वयकांची बैठकही होणार आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. आज सुरु असलेल्या मूक मोर्चात उपस्थितीत मान्यवर आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या आंदोलनाला पाठींबा देत आपली भूमिका मांडली.
खासदार छत्रपती संभाजी राजे यांची पत्रकार परिषद बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2011511075656647&id=103446941470343

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले,
– मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळाले पाहिजे यात कुणाच्याही मनात दुमत नाही
– मराठा समाज आणि ओबीसीं समाज दोघेही अडचणीत
– मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबींसींचा आक्रोश मोर्चा नाही
– काही जण मराठा समाज आणि ओबीसीमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत
– सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण नाकारले, तर ओबीसींचे होतं ते रद्द केले
– सर्वांना एकत्र येऊन लढले पाहिजे
– मराठा आरक्षणासाठी कोर्टात लढतांना केंद्र सरकारची मदत गरजेची
– चर्चेशिवाय मार्ग नाही
– मी तुमच्या बरोबर आहे

IMG 20210621 WA0118

IMG 20210621 WA0128

IMG 20210621 WA0127 rotated

IMG 20210621 WA0129

IMG 20210621 WA0124

IMG 20210621 WA0121 1

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कामगारांचे संरक्षण वाढणार! महिन्यात भरपाई न दिल्यास कंपनीवर होणार ही कारवाई

Next Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये  ३२८ ने घट, २ हजार ४९० रुग्णांवर उपचार सुरू

India Darpan

Next Post
carona 1

नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये  ३२८ ने घट, २ हजार ४९० रुग्णांवर उपचार सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011