मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. त्यानंतर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार झिशान सिद्दीकी आणि भाजप पदाधिकारी यांच्या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की, ह्याला म्हणतात हिटविकेट…मॅडम, भाई आणि सहकारी निवडणूक चर्चा (कट्टर हिंदू- मुस्लिम कार्यकर्त्यांना फसवण्याचा प्रोग्राम) असे म्हटले आहे. सिद्दीकीच्या सल्ल्याने त्यांनी मनसेच्या तिकीटावर लढण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यातून शिवसेना ठाकरे गट व मनसे नेते यांच्यात मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा झिशान सिद्दीकीला होईल असे त्यांच्या पोस्टवरुन दिसते. विशेष म्हणजे त्यांनी राजसाहेबांना फसवलं असाही आरोप केला आहे.
तर दुस-या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, खरं तर मी कोणत्याही मेसेज वर व्यक्त होणार नव्हतो परंतु ज्यांना विषय माहीत नाही, विधानसभेची परिस्थिती माहीत नाही, काय घडलं ते माहीत नाही , ते देखील व्यक्त होत आहेत. आणि ते माझेच महाराष्ट्र सैनिक सहकारी आहेत म्हणून काय घडलं हे त्यांना सांगणे मी माझी जबाबदारी समजतो म्हणून मी एक खुलासा करत आहे, मला उमेदवारी मिळाली नाही हा विषयचं नाही पण ज्यांना उमेदवारी दिली गेली आहे त्या मनसेतनं जिंकण्यासाठी नाही तर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उभे राहत आहेत.
सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी वेळ साधारणता रात्री ९.३० – १०.३० दरम्यान ठीकाण मकबा हाईट्स येथे मिटींग झाली तिथे झिशान सिद्दीकी यांच्याबरोबर सौदा करून फक्त आणि फक्त त्यांच्या सांगण्यावरून निवडणुक मनसेतून लढण्यासाठी ह्या तयार झाल्यात. खार पूर्वचे आमच्या येथील बेचारे हिंदू संघटनेतील कार्यकर्ते समजत आहेत कि ह्या मॅडम त्या मुसलमान उमेदवाराला पाडायला उभे आहेत पण त्यांना माहीत नाही त्या तर त्या मुस्लिम आमदाराच्या पैश्यावरच त्यांच्या सांगण्यावरून उभ्या आहेत. आमच्या वांद्रे पूर्व येथील काही भाजपा प्रेरित हिंदू संघटना आम्ही झिशान सिद्दीचं या मुस्लिम उमेदवाराचे काम करणार नाही हे सांगण्यासाठी ह्या मॅडम बरोबर सागर बंगल्यावर देखील गेले होते, त्यांना काय माहीत कि हा खेळ तर त्यालाच जिंकवण्यासाठी ह्या करत आहेत. २८ तारखेला ११ वाजेपर्यंत झिशान भाईंशी चर्चा होईपर्यंत त्यांना मनसे पक्षाची उमेदवारी नको होती. कारण त्याचं आणि त्यांच्या एकच असलेल्या सहकाऱ्यांचं मत होतं कि मनसे पक्षातून जिंकतां येणार नाही’ मनसेला वांद्र्यात वोट बॅंक नाही’. आणखीन खूप काही घडलं २८ तारखेच्या रात्री माझ्यावर माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांचा विश्वास नसेल तर त्याचा देखील खुलासा करीन योग्य वेळी. नाराजगी राजसाहेबांना फसवले जात आहे त्याबाबतीतली आहे आणि प्रयत्न करून पण मी माझ्या साहेबांना सांगण्यासाठी त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी देखील अपयशे झालो. कारण आज सर्व आसपासची लोकं स्वतःला प्रशांत किशोर सारखे ‘ strategist’ समजायला लागले आहेत. त्या मॅडम जिंकल्या तरी मनसे पक्षात राहणार नाहीत आणि हरल्या तरी राहणार नाही, कारण तसं ठरवूनच आणि त्यांच्या Bosses काढून पुनर्वसनाचा वादा घेऊनच त्या मनसेत आल्या, “रात्र भर कभी हां कभी ना”करत मग सकाळी शेवटी आल्या.माझ्या राजसाहेबांना फसवले जात आहे मला माहीती आहे आणि गप्प बसणं ह्याला जर काही कमेंट करणारी लोकं राज निष्ठा समजत असतील तर माफी आसावी मी असा राज निष्ठ नाही. ( काहींना प्रश्न पडलेला कि मला २०१९ ला उमेदवारी दिलेली तर मी काय केलं ? उत्तर : ५ हजार मत होते मी लढण्या अगोदर त्याचे दुप्पट पेक्षा जस्त केलेत.)
तुर्तस इतकच