इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मोठी घोषणा केली. ३ नोव्हेंबरला उमेदवार आणि मतदार संघ जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी ज्यांनी फॅार्म भरला त्यातील एकच राहील, बाकीच्यांनी फॅार्म काढायचे आहेत असेही त्यांनी सांगितले.
आज अंतरावली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची मुस्लिम व बौध्द धर्मगुरुसोबत महत्त्वाची बैठकी पार पडली. त्यानंतर जरांगे, वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमांनी, आनंदराज आंबेडकर यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्ही लोकशाही मार्गाने पुढे जात आहोत. कोणीही दादागिरी करणार नाही असेही त्यांनी सांगितले. लोकशाही मार्गाने लढा, आपल्या जागा सगळ्या ठिकाणी निवडून येतील असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले असल्याचेही सांगितले.
यावेळी वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमांनी म्हणाले की, देश कठीण परिस्थितीतून जात आहे. अनेक आव्हाने आहेत. देशातील लोक विभाजीत झाले तर विदेशी ताकदीचा मुकाबला करता येणार नाही. फोडा आणि राज्य करा हा जुनाच फॅार्म्युला वापरला जात आहे. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. आर्थिक राजधानी येथेच आहे. पण, राज्यातील भांडवल गुजरातला नेलं जात आहे. हा महारष्ट्राच्या अस्मितेचा सवाल आहे. राज्याच्या इतिहास प्रेम व सदभावनेचा आहे असेही त्यांनी सांगितले.