India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दुचाकीवरुन जाणाऱ्या पोलिसाला रस्त्यातच आला हार्टअटॅक…. तरुणाने असे वाचवले प्राण…. नशिब आणि देवदूताची सर्वत्र चर्चा…

India Darpan by India Darpan
May 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जीवन हे अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हणतात. कधी काय होईलयाचा नेम नसते. असाच एक प्रकार एका पोलिसाच्या बाबतीत झाला आहे. दुचाकीवरुन जाणाऱ्या पोलिसाला अचानक हार्टअटॅक आला. सहाजिकच आता या पोलिसाचे काही खरे नाही, असे सगळ्यांनाच वाटेल. मात्र, एका कर्तव्यदक्ष आणि समयसूचक तरुणामुळे या पोलिसाचे प्राण वाचले आहेत. ही घटना मनमाड शहरातील आहे. रेल्वे पोलिस दलातील या कर्मचाऱ्यासाठी तरुण देवदूतच ठरला आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, रेल्वे पोलिस नागेश दांडे हे दुचाकीवरून ड्युटीवर जात असताना शहरातील मुख्य बाजार पेठेत त्याच्या छातीत दुखू लागले आणि ते दुचाकीवरून खाली पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तेथे मोठया प्रमाणात गर्दी झाली. यावेळेस बघ्यांनी व्हिडीओ काढला तर काहींनी दारू पिऊन पडल्याचे सांगत काढता पाय घेतला. पण, तेथून भागवत झाल्टे हा तरुण जात असताना गर्दी पाहून थांबल्या नंतर नागेशला अस्वस्थ पाहून याच्या लक्षात आले की त्याला हार्ट अटॅक आला.

झाल्टे ने क्षणाचाही विलंब न करता दोन्ही हाताने त्याच्या छतीवर दोन तीन वेळा दाब दिला त्यानंतर त्याला तोंडाने श्वसोश्वास दिला तीन चार वेळा केल्यानंतर पोलीस नागेश शुध्दीवर आला. त्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केली असता नागेशला हृदय विकाराचा जोरदार धक्का बसला होता मात्र झाल्टे ने दाखविलेल्या समय सूचकतेमुळे त्याचे प्राण वाचले एका प्रकारे नागेशसाठी भागवत झाल्टे हा देवदूत ठरला..

Manmad Police Heart Attack Youth Emergency Help


Previous Post

MBBS च्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; डॉ. भारती पवार यांनी दिली माहिती

Next Post

धक्कादायक! तरुणीला आधी ब्लॅकमेल केले… नंतर वेश्या व्यवसायात ढकलले… नाशिकच्या सुराणा दाम्पत्याविरुध्द गुन्हा दाखल

Next Post
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक! तरुणीला आधी ब्लॅकमेल केले... नंतर वेश्या व्यवसायात ढकलले... नाशिकच्या सुराणा दाम्पत्याविरुध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group