मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जीवन हे अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हणतात. कधी काय होईलयाचा नेम नसते. असाच एक प्रकार एका पोलिसाच्या बाबतीत झाला आहे. दुचाकीवरुन जाणाऱ्या पोलिसाला अचानक हार्टअटॅक आला. सहाजिकच आता या पोलिसाचे काही खरे नाही, असे सगळ्यांनाच वाटेल. मात्र, एका कर्तव्यदक्ष आणि समयसूचक तरुणामुळे या पोलिसाचे प्राण वाचले आहेत. ही घटना मनमाड शहरातील आहे. रेल्वे पोलिस दलातील या कर्मचाऱ्यासाठी तरुण देवदूतच ठरला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, रेल्वे पोलिस नागेश दांडे हे दुचाकीवरून ड्युटीवर जात असताना शहरातील मुख्य बाजार पेठेत त्याच्या छातीत दुखू लागले आणि ते दुचाकीवरून खाली पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तेथे मोठया प्रमाणात गर्दी झाली. यावेळेस बघ्यांनी व्हिडीओ काढला तर काहींनी दारू पिऊन पडल्याचे सांगत काढता पाय घेतला. पण, तेथून भागवत झाल्टे हा तरुण जात असताना गर्दी पाहून थांबल्या नंतर नागेशला अस्वस्थ पाहून याच्या लक्षात आले की त्याला हार्ट अटॅक आला.
झाल्टे ने क्षणाचाही विलंब न करता दोन्ही हाताने त्याच्या छतीवर दोन तीन वेळा दाब दिला त्यानंतर त्याला तोंडाने श्वसोश्वास दिला तीन चार वेळा केल्यानंतर पोलीस नागेश शुध्दीवर आला. त्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केली असता नागेशला हृदय विकाराचा जोरदार धक्का बसला होता मात्र झाल्टे ने दाखविलेल्या समय सूचकतेमुळे त्याचे प्राण वाचले एका प्रकारे नागेशसाठी भागवत झाल्टे हा देवदूत ठरला..
Manmad Police Heart Attack Youth Emergency Help