मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील दिलीप सांगळे या शेतकऱ्याने कृषी बाजार समितीमध्ये विक्रीला आणलेल्या कोथिंबीर व्यापारी घ्यायला तयार नसल्याने त्यामुळे नाराज झालेल्या या शेतक-यांनी चक्क कोथिंबीर ओरडून ओरडून फुकट वाटली. कोथिंबीर पिकासाठी त्यांना १५ हजार रुपये खर्च आला मात्र एवढा खर्च करून पदरात काहीच पडत नसल्याने अखेर त्यांना कोथिंबीर बाजारात फुकट वाडली. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाला कवडीमोल भावाने विकला जात असल्यामुळे शेतक-यांमध्ये संताप आहे. सांगळे यांनी आपला हा संताप वेगळ्या मार्गाने व्यक्त करुन सरकारचे लक्ष वेधले.