मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज नांदगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी मनमाडसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या मनमाड – करंजवण जलवाहिनी योजनेच्या नियोजित जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेची रायपूर येथे भेट देऊन पाहणी केली. मनमाडची पाणी टंचाई दूर करणारी हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे पाणी पुरवठा योजना आपल्या सरकारच्या काळात मंजूर झाली आहे. त्याचे श्रेय दुसऱ्याला घेऊ देऊ नका अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. तसेच काही अडचण आल्यास सांगा असा दिलासा ठाकरे यांनी यावेळी दिला. दरम्यान या योजनेचे १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्यापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी योजनेला भेट दिल्याने योजनेच्या कामावरून श्रेयवाद सुरू झाल्याची चर्चा आहे.