मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरापासून जवळच असलेल्या वागदर्डी धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. ही घटना मेंढ्या चरण्यासाठी गेलेल्या मेंढपाळ याच्या लक्षात आली व त्याने त्वरित धरणावर ड्युटीवरील कर्मचाऱ्याला ही बाब कळविली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यावर शोध घेण्यात आला. तपासा दरम्यान आढळलेला मृतदेह हा शहरातील विवेकानंद नगर येथील राहणारा अभिषेक सरोदे याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.