मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल निशाणी मिळाल्यानंतर मनमाडला कार्यकर्त्यानी मशाल पेटवून जल्लोष केला. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल चिन्ह दिल्यानंतर शिवसैनिक हातात मशाल घेऊन रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी एकात्मता चौकात फटाक्याची आतषबाजी करत मशाल पेटवून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेनेची निशाणी मशाल, आमची निशाणी मशाल अशा घोषणा देत या निशाणीला घराघरात पोहचविणार असल्याचा निर्धार केला.