अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मनमाड शहरात सर्व धर्मगुरुंच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय एकात्मता पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत मनमाड़ शहरातील सर्व समाजाचे धर्म गुरू, सामाजिक, राजकीय, कामगार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. मनमाड़ रेल्वे हॉस्पिटल येथून सुरू झालेली पद यात्राने शहरातील प्रमुख मार्गावरून जात सर्व वसंतराव नाईक पुतळा-महात्मा गांधी पुतळा-महात्मा ज्योतिबा फुले पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ बाबासाहेब अंबेडकर पुतळयांना पुष्पहार अर्पण करीत एकात्मता चौक येथे पदयात्रेचा समारोप झाला.