India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पेटीएमचा पिरामल फायनान्ससोबत सहयोग

India Darpan by India Darpan
August 14, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

मुंबई- भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी, तसेच क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी कंपनी ब्रॅण्ड पेटीएमच्या मालकीहक्क असलेल्‍या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज पिरामल फायनान्स म्हणून संदर्भित पिरामल कॅपिटल अॅण्ड हाऊसिंग फायनान्स लि.सोबत सहयोगाची घोषणा केली. या सहयोगांतर्गत भारतातील लहान शहरे व नगरांपर्यंत व्यापारी कर्जांचे वितरण वाढवण्यात येणार आहे. पिरामल कॅपिटल अॅण्ड हाऊसिंग फायनान्स लि. ही पिरामल एंटरप्राइजेज लिमिटेडची पूर्णत: मालकीची उपकंपनी आणि भारतातील एक स्थापित आर्थिक सेवा कंपनी आहे. हा सहयोग पेटीएमच्या कर्ज वितरण व्यवसायाचा विस्तार करेल, ज्याला पिरामल फायनान्सच्या संपूर्ण भारतातील ३०० हून अधिक शाखांच्या विस्तृत नेटवर्कचा पाठिंबा असेल. हा सहयोग लघु व्यवसाय आणि किरकोळ विक्रेत्यांना कर्ज सुविधा उपलब्‍ध करून देत आर्थिक समावेशनाला चालना देण्यास मदत करेल.

पेटीएमने संपूर्ण देशातील मोठ्या व लहान शहरांमधील व्यापार्‍यांना मोठ्या प्रमाणात संपादित केले आहे. या व्यापक व्यापारीवर्गाचा लाभ घेत पिरामल फायनान्सची डेटा-संचालित अंडररायटिंगच्या माध्यमातून लघु व्यवसाय मालकांना सुलभ कर्ज सुविधा, तसेच व्यवसाय उत्पन्नावर आधारित कर्ज मंजूरी देण्याची योजना आहे. याव्यतिरिक्त हा सहयोग वैयक्तिक कर्जांचा समावेश करण्यासाठी लवकरच विस्तारित होईल, जेथे पिरामल फायनान्स जोखीम व ग्राहक विभागाची सखोल माहिती देते.

पेटीएमच्या कर्ज व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात अवलंब होताना दिसण्यात आला आहे आणि हा सहयोग व्यासपीठावर न्यू-टू-क्रेडिट व्यापारी सहयोगींना आणेल. हा सहयोग त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी विनासायास कर्ज मिळवण्याची आणि भांडवल आवश्यकतांची पूर्तता करण्याची सुविधा देईल. व्यापारी सहयोगी ६ ते २४ महिन्यांच्या मुदतीसह जवळपास १० लाख रूपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतील. अधिक सोयीसुविधा देण्यासाठी पेटीएम किमान कागदपत्र व्यवहारांसह पूर्णत: डिजिटल ऑनबोर्डिंग प्रक्रिया सक्षम करेल.

पेटीएममधील लेण्डिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पेमेंट्सचे प्रमुख भावेश गुप्ता म्हणाले, “आमच्या सर्व कर्ज देणा-या उत्पादनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, जेथे आम्ही लहान शहरे व नगरांमधील एमएसएमईंना डिजिटल क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देत सक्षम करतो. आमच्या कर्ज देणा-या उत्पादनांचे यश व प्रमाणामधून आम्हाला आमच्या क्रेडिट ऑफरिंग्जला अधिक चालना देण्यास व विस्तार करण्यास आत्मविश्वास मिळतो. पिरामल फायनान्ससोबतचा आमचा सहयोग याच दिशेने आणखी एक पाऊल आहे, जेथे आम्ही सहयोगाने अधिकाधिक व्यापा-यांना औपचारिक क्रेडिट अर्थव्यवस्थेमध्ये आणू.”

पेटीएमने भारतातील डिजिटल लेण्डिंग बाजारपेठेत प्रबळ उपस्थिती निर्माण केली आहे. कंपनीला मार्की कर्जदात्यांसोबतच्या सहयोगाने व्यासपीठावर देण्यात आलेल्या सर्व लेण्डिंग क्षेत्रांमध्ये (पेटीएम पोस्टपेड, पर्सनल लोन्स व मर्चंट लोन्स) प्रबळ वाढ होताना दिसत आहे. आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीत पेटीएमने ८.५ दशलक्ष कर्जे वितरित केली, ज्यामध्ये वार्षिक ४९२ टक्क्यांची वाढ झाली. मूल्यसंदर्भात कंपनीने ५,५५४ कोटी रूपये मूल्य असलेली कर्जे वितरित केली, ज्यामध्ये वार्षिक ७७९ टक्क्यांची वाढ झाली.


Previous Post

मनमाडला राष्ट्रीय-एकात्मतेचे दर्शन घडवत तिरंगा-पदयात्रा (बघा व्हिडिओ)

Next Post

मनमाडचे वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो, सांडव्यावरून पाणी वाहू लागले (बघा व्हिडीओ)

Next Post

मनमाडचे वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो, सांडव्यावरून पाणी वाहू लागले (बघा व्हिडीओ)

ताज्या बातम्या

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group