अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आज पासून नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि प्रत्येकाला शाळेत जायची ओढ लागली. अनेक शाळां मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल होत. मनमाडच्या छत्रे न्यू इंग्लीश स्कुल मध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आली. शाळेच्या प्रवेशव्दारावर आकर्षक रांगोळी, फुले व रंगबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे औक्षण करण्यात येऊन फुलांचा वर्षाव करण्यात येऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोनाकाळा नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर शिक्षुवर्गापासून ते मोठ्या इयत्तेच्या शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद पहावयास मिळाला.