मनमाड ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – मनमाडच्या लोहमार्ग पोलीसांनी लॅपटॉप चोरणाऱ्या चोरट्यास २४ तासाच्या आत अटक केली आहे. ३० मार्च रोजी फिर्यादी विशाल सुरेश राठोड (रा. शेवळी तांडा तालुका जिल्हा जालना) हे मनमाड येथील बुकिंग ऑफिसच्या बाजूला असणाऱ्या वेटिंग हॉलमध्ये झोपलेले असतांना ही चोरी झाली होती. त्यात त्यांची काळा रंगाची लॅपटॉप बँग, आधार कार्ड पॅन कार्ड व इतर वस्तू अशा एकूण ४३ हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरीस गेल्या होत्या.
या चोरीनंतर रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सीसीटीव्ही आधारे व मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपीचा शोध घेत असताना संशयित आरोपी समाधान सुरेश वाघ (वय २५ वर्ष, रा. नाशिक) बॅगसह मिळून आला आहे. या आरोपीला पकडल्यानंतर त्यांच्याकडे लॅपटॉप मिळून आले.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार खडककर हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, लोहमार्ग औरंगाबाद उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक काजवे ,पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, दिनेश पवार, रवींद्र खडतकर, महेंद्र पाटील, किशोर कांडिले, राहुल राजगिरे, जितेंद्र देशमुख, राकेश ठाकूर महेंद्र माळी यांनी केली.
? धक्कादायक! *मच्छर कॉईलमुळे एकाच घरातील तब्बल ६ जणांचा मृत्यू*
दिल्ली हादरली
https://t.co/yMUbZ6dKug#indiadarpanlive #6peoples #died #one #family #mosquito #coil #delhi #crime— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 31, 2023
? सावधान! *जवळपास अनेक घरांमध्ये सर्दी, तापाचे रुग्ण…*
बिल्कुल अंगावर काढू नका….
हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची गर्दी
https://t.co/6WPXPafInO#indiadarpanlive #alert #viral #infection #corona #h3n2 #health #update #covid19— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 31, 2023
Manmad Crime Railway Station Laptop Theft