मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीजेचा पुरवठा करणाऱ्या महावितरण या सरकारी कंपनीचा भोंगळ कारभार अनेकदा समोर येतो. आताही असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. शहरात हातगाड्यावर बांगड्या विकणाऱ्या विक्रेत्याला एक महिन्याचं तब्बल ४ लाख रुपयाचे वीज बील पाठविण्यात आले आहे. त्यामुळे
मनमाड शहरात वीज महावितरणचा अजब कारभार समोर आलं आहे. साधारण घरात राहणाऱ्या आणि हातगाड्यावर बांगड्या विकणाऱ्याला एक महिन्याचं तब्बल ४ लाख रुपयाचे वीज बील पाठवण्यात आले आहे. बील न भरल्यामुळे वीजेचं मिटरही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढून नेले आहे. त्यामुळे या विक्रेत्याच्या कुटुंबाला अंधारात राहण्याची वेळ आली आहे
इकबाल शेख असे बांगडी विक्रेत्याचे नाव आहे. त्यांच्या घरात ३ बल्ब आणि १ पंखा आहे असे असताना देखील त्यांना वीज महावितरणनें एक महिन्याचे तब्बल ४ लाख ५ हजार ४९० रुपयाचे बील पाठविले आहे. बिल पाहून शेख यांना धक्काच बसला. त्यांनी महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली. मी दर महिन्याला बील भरतो, माझी थकबाकी नसताना मला लाखो रुपयाचे बील देण्यात आले, अशी तक्रार त्यांनी केली.
तक्रारीनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ४ लाखांचे वीज बील कमी करून २ लाख १३ हजार ३६० रुपये केले. आणि हे बील तातडीनें भरण्यास बजावले. मी गरीब व्यक्ती आहे, माझी थकबाकी नसताना इतकं बील कसं आणि का भरू, असे त्यांनी विचारले. मात्र, त्यांचं काहीही ऐकण्यात आलं नाही. उलट त्यांचे वीज मीटर काढून नेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, याबाबत वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, महावितरणच्या या भोंगळ कारभाराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
Manmad Bangel Businessman 4 Lakh Electricity Bill