मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार संजय पवार तर उपसभापती पदी कैलास भाबड बिनविरोध निवड झाली आहे. कृऊबाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवत यश मिळवले होते. त्यानंतर व्यापारी गटाच्या दोन संचालकांनी त्यांना पाठींबा दिला. यानंतर सभापती व उपसभापतीची निवड झाली आहे.
या निवडणुकीत आ. सुहास कांदे यांच्या पॅनलचे तीनच सदस्य निवडून आल्यामुळे त्यांनी दोन्ही पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. पंचवार्षिक निवडणुकीत मतदार संघातले पाचही माजी आमदार एकत्र आले. तर दुसरीकडे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी पॅनल उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक चर्चेची ठरली होती. त्यानंतर सभापती व उपसभापती निवडणुकीत महाविकास आघाडी कोणाला अगोदर संधी देते याकडे सर्वांचे लक्ष होते.
महाविकास आघाडीने राष्ट्रवादीत असलेले माजी आमदार संजय पवार यांनी पहिली संधी सभापती पदासाठी दिली. तर उध्दव ठाकरे गटातर्फे कैलास भाबड हे उपसभापतीपदासाठी निवडले गेले.
Manmad APMC Election Sabhapati Upsabhapati