इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पर्यावरणाचा समतोल बिघडत असून नवनवीन संशोधने समोर येताहेत. त्यात भर घालणारे एक संशोधन मॅक्स प्लँक इन्स्टिट्युट फॉर केमिकल इकोलॉजीने केले आहे. या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार, माणसांमुळे माशा समलैंगिक होत असल्याचा आश्चर्यकारक दावा करण्यात आला आहे.
पृथ्वीवरील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे तापमानात सातत्याने बदल आणि विविध आरोग्यासंबंधित समस्या वाढताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, या प्रदूषणाची इवल्याच्या माशीवरही वाईट परिणाम झाला आहे. प्रदूषणामुळे माशांना जोडीदार निवडण्यात अडचणी येत आहेत. नर माशी आणि मादी माशी यात काय फरक आहे, हे माशांना समजत नाही. हेच कारण आहे की, आता पृथ्वीवर आढळणाऱ्या माशा नकळतपणे समलैंगिक होत असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. संशोधनानुसार, मानवाने पसरवलेल्या प्रदूषणामुळे हा बदल माशींमध्ये होत आहे. ओझोनचे प्रदूषण वाढत आहे, यामुळे माशांवर दुष्परिणाम होत आहे. या प्रदूषणामुळे माशांमधील फेरोमोन्स नावाचे हार्मोन्स तयार होत नाही. त्यामुळे माशांना नर आणि मादी ओळखण्यात अडचणी येताहेत.
असा पडतोय प्रभाव
ओझोनची पातळी १०० पीपीबी राहिली तर माशांमध्ये आढळणाऱ्या फेरोमोन्स हार्मोनचा प्रभाव झपाट्याने कमी होतो. त्यामुळे माशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या हार्मोनच्या कमतरतेमुळे त्यांच्या शरीरातही अनेक बदल होत असतात. जेव्हा शास्त्रज्ञांनी माशांवर हे संशोधन केले तेव्हा त्यांना आढळले की, १० नर माशींपैकी फक्त ७ माशी मादी माशीकडे जात आहेत, तर तीन नर माशा नर माशींसोबत समलैंगिक संबंध बनवतात.
Man Effect House Flies Research Study Report