मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पॅनल विजयी झाल्याने गावातून विजयी जल्लोष मिरवणूक सुरु असतांना विरोधी गटात बाचाबाची होऊन त्यात दगडफेक करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. विरोधी पक्षाकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेत काही जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या घटनेची माहिती तालूका पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाव घेत त्यांनी गावात शांतता राखण्याचे आवाहन केले. या घटनेमुळे टोकडे गावात सध्या तणावपुर्ण शांतता असून गावात कफ्यु सदृष्य परिस्थिती आहे.