India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

होमथॉन प्रदर्शनात घर बुक करणाऱ्यांना मिळणार ही मौल्यवान भेट; प्रदर्शनाची जय्यत तयारी पूर्ण

India Darpan by India Darpan
December 20, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे चार दिवसांचे ‘होमथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून युद्ध पातळीवर स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे. तसेच बहुतांश काम पूर्णतः कडे गेले आहे. शहारात ठीकठिकाणी चौकाचौकात या प्रदर्शनाच्या जाहिराती लावण्यात आल्याने आता सर्वांनाच या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे.

आपल्या स्वप्नातील घर घेणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच ठरणार असून नाशिक, मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरीकांना उपलब्ध होईल,अल्प व मध्यम उत्पन्नगटातील लोक केंद्रबिंदू धरून अगदी १५ लाखांपासून ते सुमारे ४ कोटी रुपयां- पर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरीकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. भारतातील गृहनिर्माण आणि रिअल इस्टेट क्षेत्रासाठी नोडल एजन्सी म्हणून, नरेडकोचे विधायक, कायदेशीर आणि नियामक समस्यांपासून ते क्षेत्रातील व्यावसायिक समस्यांपर्यंत देखरेख करण्याचे व सोडवण्याचे कार्य करत आहे.

नरेडकोच्या ४ चाप्टर मधील नाशिक पश्चिम विभागातील हे पहिलेच प्रदर्शन आहे. गृहस्वप्न बाळगणाऱ्यांना नाशिक, मुंबईसह नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे उपलब्ध होईल, विशेष म्हणजे हे प्रदर्शन ७ एकर मध्ये होत आहे, त्यात ४ डोममध्ये होणार असून त्यात १२५ हून अधिक स्टॉल्स आहेत. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्यांचे स्टॉल्सही येथे साकारण्यात येत आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही स्टाॅलवर घर बुक करणाऱ्यास लगेचच नरेडकोतर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे. प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्यांनाही नरेडकोतर्फे लकी ड्रॉद्वारे एक भेट मिळणार आहे. या प्रदर्शनासाठी सहप्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो, केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे नाशिक शहरात प्रथमच सगळ्यात भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशन ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन नरेडकोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बांधकाम क्षेत्रातील अर्ध्वयू डॉक्टर निरंजन हिरानंदानी आणि नरेडको नॅशनल प्रेसिडेंट राजन बांदेलकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार तसेच नरेडकोच्या होमथॉन एक्स्पो २०२२ या प्रदर्शनाची ब्रँड ॲबेसॅडर व अभिनेत्री प्राजक्ता माळी या देखील या प्रदर्शनाला भेट देणार आहेत.

या प्रदर्शनाच्या डोम उभारणीच्या कामाच्या पाहणी प्रसंगी प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे, नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड, नरेडकोच्या प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर, नरेडकाे नाशिकचे सचिव सुनील गवादे, सहसमन्वयक शंतनू देशपांडे, अविनाश शिरोडे, राजन दर्यानी, मयूर कपाटे, श्रीहर्ष घुगे, अश्विन आव्हाड, भाविक ठक्कर, अश्विन आव्हाड, श्रीहर्ष घुगे, प्रशांत पाटील, नितीन पाटील , मयूर कपाटे, भूषण महाजन,नंदन दीक्षित, प्रशांत पाटील, अॅड. पी. आर. गीते, देवेंद्र अहिरे, भूषण महाजन, राजेंद्र बागड, नितीन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनात मोफत प्रवेश….
प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही मात्र प्रवेश करण्यापूर्वी नागरीकांना क्यू आर कोड द्वारे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सदर प्रदर्शन हे डोंगरे वसतिगृह मैदानावर २२ ते २५ डिसेंबर पासून नागरीकांना खुले असून जास्तीतजास्त नागरीकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ग्रीन एक्झिबिशन….
नरेडकोच्या ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” या प्रदर्शनात सामाजिक बांधिलकी म्हणून एक अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. या प्रदर्शनामध्ये जमा झालेला प्लास्टिकचा कचरा पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटल मध्ये भरला जाणार असून या बॉटल्स ग्रामीण भागात बांधकामासाठी वापरला जाणार आहे. तसेच या नरेडकोच्या प्रदर्शनात ब्रँडिंगसाठी वापरण्यात आलेले फ्लेक्स होर्डिंग गोळा करून त्याचे छत बनवून गरिब लोकांच्या घरावर छप्पर म्हणून लावण्यात येणार आहे.

Nashik Homethon Expo Preparation Complete Real Estate
Naredco Property Home


Previous Post

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी फडणवीसांनी विधानसभेत दिली ही माहिती

Next Post

मालेगाव तालुक्यातील टोकडे येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीत दगडफेक

Next Post

मालेगाव तालुक्यातील टोकडे येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीत दगडफेक

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group