मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांची मालेगावात धडक… काही वेळातच दादा भुसेंच्या घराला देणार वेढा…

by Gautam Sancheti
जानेवारी 16, 2023 | 12:45 pm
in स्थानिक बातम्या
0
20230116 133444

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आजपासून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या घरासमोर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. घराकडे जाणा-या रस्त्यावरही बॅरिकेटस लावले आहे. दरम्यान मंत्री भुसे हे सांगली येथे दौ-यावर असल्यामुळे घरात कुटुंबातील सदस्यच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी मालेगावात धडक दिली आहे. आंदोलक शेतकरी आता दादा भुसे यांच्याघराकडे निघाले आहेत. काही वेळातच ते त्यांच्या घराला वेढा देणार आहेत.

नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून सक्तीची वसूली मोहीम सुरू आहे. यामध्ये मात्र काही थकबाकीदारांना वगळून जिल्हा बँकेने गरीब शेतकऱ्यांनाच वेठीस धरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या या कारवाईस विरोध दर्शविला आहे. तसेच काही कर्जदार शेतकऱ्यांचे खासगी वाहने देखील जिल्हा बँकेने जप्त करण्यात सुरू केली आहे. बँकेच्या या मनमानी विरोधात स्वाभिमानी शेतकऱ्यांनी संघटनेने पालकमंत्र्यांच्या घरासमोर बिऱ्हाड मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
20230116 123455

जिल्हा बँकेच्या जप्ती मोहिमे विरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या कारणांमुळे शेतकऱ्यांची बाजू घेत स्वाभिमानी शेतकरी संघननेने यापूर्वी बैठक घेतली होती. त्यानुसार सोमवारी, दि. १६ जानेवारी २०२३ रोजी बिऱ्हाड आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे. राजू शेट्टी यांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. जिल्हा बँकेने सुरू केलेली वसूली थांबवावी, कर्ज माफ करू नका पण काहीतरी सवलत द्या यासाठी हातातील काम सोडून या आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन केले आहे. परंतु राजू शेट्टी यांनी यावेळी शेतकऱ्यांना आंदोलनात बघ्याची भूमिका घेऊ नका, असे थेट सुनावत आंदोलन अधिक आक्रमकपणे करण्यासाठी आवाहन केले आहे.

विशेष म्हणजे या बिऱ्हाड आंदोलनात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलन पुकारणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने पुकारलेल्या बिऱ्हाड मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनात राजू शेट्टी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी घरासमोर कडकोट बंदोबस्त ठेवला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी गिरणा पुलावरून पायी कार्यकर्त्यांसह निघाले
दादा भुसे यांच्या बंगल्यावर काही वेळात पोहचणार

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हवामान विभागाला हलक्यात घेऊ नका! सांगितले तसेच घडणार, हवामान अंदाज अचूक होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर

Next Post

डी गँगची नजर आता बॉलिवूडकडून थेट टॉलिवूडवर; तपास यंत्रणांच्या निदर्शनास आल्या या धक्कादायक बाबी…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Tollywood e1673853759474

डी गँगची नजर आता बॉलिवूडकडून थेट टॉलिवूडवर; तपास यंत्रणांच्या निदर्शनास आल्या या धक्कादायक बाबी...

ताज्या बातम्या

solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011