India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

डी गँगची नजर आता बॉलिवूडकडून थेट टॉलिवूडवर; तपास यंत्रणांच्या निदर्शनास आल्या या धक्कादायक बाबी…

India Darpan by India Darpan
January 16, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडला मागे टाकत टॉलिवूडची उलाढाल वाढताच अंडरवर्ल्डने तिथेही शिरकाव करीत पाय रोवले आहेत. नात्यातील आणि मर्जीतील अभिनेते, अभिनेत्रींमार्फत मोठया प्रमाणात पैशांची गुंतवणूक केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) हा खळबळजनक खुलासा केला आहे. छोटा शकीलने आपल्या कुटुंबीयांमार्फत ही उलाढाल केली असल्याची माहिती पुढे येत असून त्याला यासाठी नेमकी कोणी, कशी मदत केली त्याचा तपास केला जात आहे.

मल्याळी, तेलुगू, तमीळ, कन्नड यासारख्या दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटांची नगरी टॉलिवूड नावाने ओळखली जाते. तिची उलाढाल अब्जावधींच्या घरात आहे. हिंदीत डब केलेले या भाषांतील सिनेमे तिकीटबारीवर प्रचंड कमाई करत आहेत. त्यामुळे आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमने आपला मोर्चा टॉलिवूडकडे वळविल्याचे समोर आले आहे. डी राँगने टॉलिवूडमध्ये आपले बस्तानही वसविल्याचा सुगावा राष्ट्रीय तपास यंत्रणेला लागताच त्यांनी तपास केला आणि त्यातून पैशांच्या उलाढाली सोबतच टॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांचा डी गंगशी संबंध असल्याचे समोर आले.

धक्कादायक बाबी उघड
डी कंपनीशी संबंधित अनेक गोष्टींचा तपास एनआयएने केला. या ऑपरेशनमधून अनेक बाबी उपड झाल्या. छोटा शकीलच्या कुटुंबातील एक अभिनेत्री सध्या टॉलिवूडमध्ये नवीन ओळख तयार करून काम करत आहे. विशेष म्हणजे छोटा शकीलची आवडती अभिनेत्री असलेल्या मुमताजच्या नावाचा वापर करून ती टॉलिवूडमध्ये प्रसिद्धीही मिळवत आहे. गेल्या फेब्रुवारीत तिच्या बँक खात्यात छोटा शकीलच्या कुटुंबाकडून लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याची धक्कादायक बाबही एनआयएच्या निदर्शनास आली आहे.

छोटा शकीलशी कनेक्शन?
डी कंपनीतील छोटा शकीलचा मेहुणा आणि सध्या अटकेत असलेला शेख ऊर्फ आरिफ भाईजान याच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलीने चेन्नईतून टॉलिवूडमधून करिअरला सुरुवात केली. मुमताजच्या नावाचा वापर करून टॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. टॉलिवूडच्या अनेक हीट चित्रपटांत काम करून प्रसिद्ध अभिनेत्री बनली. २०२२ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये तिच्या खात्यात आधी सहा लाख आणि नंतर चार लाख असे १० लाख रुपये टाकण्यात आले होते.

D Gang Tollywood National Investigation agency NIA Findings
Investment


Previous Post

राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांची मालेगावात धडक… काही वेळातच दादा भुसेंच्या घराला देणार वेढा…

Next Post

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एसीपी विशाल ढुमे यांची तडकाफडकी बदली

Next Post

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एसीपी विशाल ढुमे यांची तडकाफडकी बदली

ताज्या बातम्या

आनंद महिंद्रा अडचणीत…याप्रकरणी गुन्हा दाखल

September 26, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींना नवीन संधीचा योग येईल… जाणून घ्या, बुधवार, २७ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 26, 2023

दुर्दैवी घटना….मनमाडला पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

September 26, 2023

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

September 26, 2023

ब्राझीलच्या शिष्टमंडळाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट, या विषयावर झाली चर्चा

September 26, 2023

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनी, बाबनकुळे यांनी केले उदघाटन

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group