नाशिक – मालेगाव येथे उसळलेल्या दंगलीसंदर्भात आतापर्यंत पोलिसांनी ४५ जणांना अटक केली आहे. तशी माहिती नाशिक विभागाचे विशेष महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी दिली आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच, सोशल मिडियात कुठल्याही पोस्ट टाकू नये. अन्यथा पोलिसांकडून अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
त्रिपुरातील घटनेनंतर मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यात पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यात काही पोलिस जखमी झाले. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल लाठीचार्ज केला. राज्यात मालेगाव, नांदेड आणि अमरावती येथे विविध पडसाद उमटले. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आता कठोर कारवाई सुरू केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1460994628769894408