मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील मालेगाव तालुका पोलिस स्टेशनचा लाचखोर पोलिस हवालदार करण गंभीर थोरात हा ४ हजार रुपयांची लाच घेताना सापडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत थोरात अडकला आहे. आता त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जात आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, दारुबंदी कायद्यान्वये एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी लाचखोर हवालदार करण थोरात याने ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. आणि त्यात थोरात हा रंगेहाथ पकडले गेला. त्यामुळे आता त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. त्यामुळे याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
malegaon Police Acb Raid Bribe Corruption