मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालूक्यातील वडनेर-खाकुर्डी पोलिस स्थानकातील आवारात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश जगताप असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच नाव आहे. आत्महत्या केलेल्या गणेश याच्या पत्नीने दोन दिवसापुर्वी आत्महत्या केली होती. त्याच्या चौकशीला त्याला पोलिस स्टेशन मध्ये बोलविण्यात आले होते. चौकशी सुरु असतांनाच त्याने पोलिस स्थानकाच्या वारातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. पोलिस स्थानकातच आत्महत्या झाल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी रात्री उशिरापर्यंत या घटनेची चौकशी सुरु होती.