मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील देवीचा मळा परीसरात पोलिसांनी १ लाख ७६ हजाराचा गुटखा व ५० हजार रुपये किमतीची अँपे रिक्षा असा २ लाख २६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी इजाज मोहम्मद युसूफ याला गजाआड करण्यात आले. एका अँपे रिक्षातून विक्री करण्यासाठी गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पवारवाडी पोलिसांनी परिसरात सापळा रचत अँपेरिक्षाची तपासणी केली असता त्यात हा गुटखा सापडला.