मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कत्तलीच्या इराद्याने जमा केलेली जनावरे मालेगावकडे घेऊन जाणार असल्याची माहिती अग्निवीर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर त्यांनी जायखेडा पोलिसांच्या मदतीने मोसम नदी काठावरील ब्रिटिश कालीन बंधाऱ्या लागत सकाळच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात येथे बांधण्यात आलेली सुमारे ४० पेक्षा जास्त जनावरे पोलिसांनी जप्त केली आहे. या बाबत अधिक तपास जायखेडा पोलीस करीत आहे