मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामिण पोलिसांच्या वतीने रेझिंग डे निमित्ताने मराठी कलाकार संजय नार्वेकर व प्रार्थना बेहरे या कलाकारांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही कलाकारांनी पोलिसांविषयी आपली भूमिका स्पष्ट करत पोलिसांमुळे आपले संरक्षण होते असे सांगितले. यावेळी त्यांच्या विषयी आपल्याला अभिमान असल्याचे सांगत कौतुक केले. यावेळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील धारा धारा बेभान वारा या गाण्यावर लहान मुलांसोबत डान्सही केला. यावेळी पोलिस अधिक-यांच कुटुंबीय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.