इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघवी करणाऱ्या आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्रीच त्याला ताब्यात घेण्यात आले. ही घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली होती. ब्युरो ऑफ इमिग्रेशनने दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघवी करणाऱ्या पुरुषाविरुद्ध लुक आउट सर्कुलर (LOC) जारी केले होते. याशिवाय दिल्ली पोलिसांचे एक पथक आरोपी शंकर मिश्रा यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी मुंबईत पोहोचले असून, आरोपीची माहिती मिळवून त्यांची चौकशी सुरू आहे. यापूर्वी, एअर इंडियाने आपल्या स्तरावर कारवाई करत आरोपींवर ३० दिवसांची प्रवास बंदी घातली आहे. नियमांनुसार, ते अशा प्रवाशाला जास्तीत जास्त शिक्षा देऊ शकतात.
दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की एअर इंडियाने केलेल्या तक्रारीच्या आधारे धक्कादायक प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 354, 509 आणि भारतीय विमान वाहतूक कायद्याच्या कलम 23 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने सांगितले की, पीडित महिला आणि आरोपी दोघेही दिल्लीत राहत नाहीत. महिलेच्या आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Air India Flight peed Women Passenger Suspected Arrested