अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मान्सूनच्या पावसाने जिल्ह्यातील मालेगाव शहरात संध्याकाळच्या सुमारास पाऊण तास वादळी वारा आणि जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पूर्व भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. शहरातील रस्त्यावर पाणी साचत असल्याने आज महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेत पाहणी केली. शहरातील अनेक भागातील नाल्यांची सफाई झालेली नसल्याने गटारीत मध्ये पाणी तुंबून ते रस्त्यावर आल्याने आयुक्तांनी तातडीने साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. एकाच पावसात जर अशा प्रकारे नाले तुंबत असल्याने मनपाने अधिक वेगाने आता नाले सफाई मोहीम हाती घेणे गरजेचे असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.