अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मान्सूनच्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात आज वादळी हजेरी लावली, जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील काही भागा बरोबरच मालेगाव शहरात संध्याकाळच्या सुमारास पाऊण तास वादळी वारा आणि जोरदार पाऊस पडला. पूर्व भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. अशा पाण्यात बच्चे कंपनीने खेळण्याचा आनंद लुटला. तर दुसरीकडे याच पाण्यातून जाताना वाहन धारकांची मात्र मोठी अडचण निर्माण झाली. शहरातील रस्त्यावर पाणी साचत असल्याने मनपाने अधिक वेगाने नाले सफाई मोहीम हाती घेणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.