सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी शिवारत सव्वा कोटी रुपयाचा मद्यसाठी ट्रकसह जप्त केला आहे. गोवा राज्यातून हे विदेशी मद्य ट्रकमध्ये असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने सापळा रचत आयशर गाडीतून येणारा १ कोटी २३ लाख ३७ हजार ९२० रुपयांचा विदेशी मद्यसाठा व २२ लाख रुपये किमतीचा ट्रक असा १ कोटी ४५ लाख ३८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व मुद्देमाल मालेगाव उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे.