मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव पोलिसांच्या शोधकार्याला मोठे यश आले आहे. पोलिसांनी बुरखाधारी तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. सराफी दुकानातून सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश यामुळे होण्याची शक्यता आहे.
शहरातील मध्यवस्तीत नेहमीच विविध प्रकारच्या चोऱ्या होत असतात. मात्र, वर्मा ज्वेलर्स या दुकानात एक चोरी झाली होती. सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तीन बुरखाधारी महिलांनी साडेसात लाख रुपयांचे दागिने हातोहात लांबविले होते. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. त्यानंतर सराफाने याबाबत मालेगाव पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह अन्य बाबींचा कसून तपास केला. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत तीन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाखाचे सहा तोळे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणाचे रॅकटच कार्यरत आहे का, हे पोलिस शोधून काढत आहेत.
Malegaon Crime 3 Suspect Women Detain