इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना काळात सगळेच ठप्प झाले. मनोरंजन विश्व देखील थांबले. एकत्र येण्यावर बंदी असल्याने सगळे चित्रीकरणही थांबले. अशा काळात अनेक नवनवीन ओटीटी प्लॅटफॉर्म्स आले, आणि वेबसिरीज देखील आल्या. त्या काळात आलेल्या वेबसिरीजना प्रेक्षकांना चांगलीच पसंती मिळाली. या वेबसिरीजच्या पुढच्या पर्वाची वाटही पहिली जाते. अशीच एक सिरीज म्हणजे ‘असुर’. अर्शद वारसी याची अत्यंत वेगळी भूमिका असलेली ही सिरीज चांगलीच गाजली. असुरांच्या उत्पत्तीपासून ते त्यांच्या अस्तित्वापर्यंतची कथा मांडण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. त्यामुळे आता सीझन २ साठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. पहिल्या सीझननंतर तीन वर्षांनी याचा दुसरा सिझन येतो आहे.
काय आहे ‘असुर’चा विषय?
अत्यंत वेगळा विषय हाताळणारी ही सिरीज प्रेक्षकांना चांगलीच भावली. विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालणारी ही सिरीज आहे. असुरांच्या उत्पत्तीपासून ते त्यांच्या अस्तित्वापर्यंतची कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असुर सिरीयल किलर बनून लोकांना मारताना दिसतोय. तर अर्शद वारसी राक्षसाला पकडण्यासाठी जीवाचं रान करतो. ‘असुर’ ही हिंदू पौराणिक कथा आणि हत्या यांच्याशी संबंधित वेब सीरिज आहे. ज्यामध्ये फॉरेन्सिक टीम सीरियल किलरचा शोध घेत आहे.
काय आहे पार्ट२ मध्ये
सीरिजच्या दुसऱ्या भागातही फॉरेन्सिक तज्ज्ञ निखिल आणि सीबीआय अधिकारी धनंजय राजपूत यांच्यातील मतभेद दिसतील. या सीरिजमध्ये अमेय वाघ याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. नेमका असुर कोण? या प्रश्नाचं स्पष्ट अजूनही मिळालं नाही. सायबर एक्सपर्ट असलेला अमेय वाघ म्हणजेच रसुल शेख नक्की कोण आहे? याचं उत्तर या भागात मिळणार आहे.
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
असुरच्या पहिल्या सीझनला चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ‘असुर सीझन 2’ या वेबसिरीजचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. अर्शद वारसी आणि बरुण सोबती यांची भन्नाट केमिस्ट्री या वेबसीरिजमध्ये दिसते. सीरिज जिथं थांबली तिथूनच या सीरिजचा पुढचा भाग सुरू होईल. रिद्धी डोगराने इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाऊंटवर ‘असुर सीझन 2’ चा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
“तुमची प्रतिक्षा आता संपली आहे. तुमच्यासाठी मोस्ट अवेटेड ‘असुर सीझन 2’ चा फर्स्ट लुक सादर करत आहे.”, असं म्हणत त्यांनी रिलीजची तारीख जाहीर केली आहे. येत्या १ जूनला जिओ सिनेमावर ही सीरिज पाहता येणार आहे. या सिरीजच्या दुसऱ्या सिझनमध्ये अर्शद वारसी, वरुण सोबती, रिद्धी डोग्रा आणि अनुप्रिया गोएंका हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये आहेत.
https://twitter.com/sharibhashmi/status/1661350863095599104?s=20
Asur Part2 web Series Arshad warsi