मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील गावात अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांची आई सत्यवती कौर यांच्या नावाने बांधलेल्या शाळेचे वादळी वाऱ्यात पत्रे उडाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान या विद्यालयाचे वादळी वाऱा आला त्यात हे पत्र उडाले त्यात शाळेचे मोठे नुकसा झाले आहे. १९८० साली ही शाळा उभारली आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी झालेल्या या घटनेमुळे शिक्षक, ग्रामस्थ, परिसरातील पालक व तेथे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची मोठी तारांबळ होणार आहे. शासनाने तातडीने मदत करून शाळा वेळेवर सुरू होण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा येथील सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी व्यक्त केली.
मालेगाव तालुक्यात फिरत असताना धर्मेंद्र यांनी टोकडे गाव पाहिले व ते या गावाच्या प्रेमात पडले. येथील ग्रामस्थांशी चर्चा करून गावात शाळा उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांची आई सरस्वती कौर यांच्या नावाने ही शाळा बांधली. त्यासाठी धर्मेंद्र यांनी ५१ हजार रुपयांची देणगी दिली.
शाळेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रामनवमीला शाळेच्या उद्घाटनासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर अभिनेत्री हेमामालिनी, दारासिंग आणि त्यांचा परिवारही होता. यावेळेस धर्मेंद्र यांची बैलगाडीतून ग्रामस्थांनी मिरवणूक काढल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.