वैभव शिंगणे, नाशिक
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या एका राशीतून दुसऱ्या राशित प्रवेश करण्यास संक्रांत म्हटले जाते. या दिवसा आधी रात्र मोठी व दिवस लहान असतो. पण या दिवशी दिवस व रात्र दोन्ही समान असतात. तसेच संक्रांतीपासून ऋतू बदलायला सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. म्हणून हा सण साजरा केला जातो.
भोगी
संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. थंडीत भाजीपाला मुबलक व स्वस्त असतो. त्यामुळे सर्व भाज्या एकत्र करु खाल्ल्या जातात. ठंडीपासून बचावासाठी तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. थंडीपासून बचावाकरिता व शरीरात उष्णतेच्या वाढी करता तीळ व गुळाचे सेवन केले जाते.
यंदा १५ जानेवारीला संक्रांत
हिंदू धर्मानुसार, सर्व सण पंचांगाच्या तिथीप्रमाणे साजरे होत असल्याने कोणत्याही सणाची निश्चित अशी तारीख सांगता येत नाही. पण हा सण दरवर्षी १४ जानेवारी येतो मग असे का? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. याचे करण ज्योतीष गणनेचे दोन पंचांग आहेत एक सायन तर दुसरे निर्यन. चंद्र ग्रहाप्रमाणे गणनेला निर्यन तर सूर्य ग्रहाप्रमाणे गणनेला सायन म्हणतात. इतर सर्व सण आपण निर्यन पंचांगाप्रमाणे साजरे करतो तर मकरसंक्रांत हा सण सायन पंचांगाप्रमाणे साजरा करतो. यामुळे १४ जानेवारीला हा सण येतो. सायन पंचाग गणने नुसार सुर्यच्या अंक्ष, कला व दिवस यांचे गणित बसवण्या करिता दर आठ वर्षांनी एक दिवस वाढवला जातो. त्यामुळे दर आठ वर्षांनी संक्रांत ही १५ जानेवारीला येते. उदा.ज्याप्रमाणे इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप वर्ष येते. फेब्रुवारीत एक दिवस वाढवला जातो. त्याप्रमाणे.
यंदा मकर संक्रांतीचा पुण्यकाल १५ जानेवारी २०२३ रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. दिनांक १४ जानेवरी २०२३ रोजी रात्री ८:४४ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.
काळे कपडे का घालतात?
याची अनेक कारणे सापडतात. हिवाळ्यामुळे काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सूर्य किरणांमुळे शरीर गरम राहते. उबदारपणा मिळतो. काळ्या कपड्यामुळे चेहऱ्याचा रंग व हलव्याचे दागिने खुलुन दिसतात. दृष्ट व वाईट नजर या गोष्टींना मानणा-या व्यक्तीच्या मते काळा रंगाचे कपडे घातल्याने नजर लागणाचा धोका संभवत नाही. यामुळेच इतर काणत्याही सणात प्रवेश नसलेल्या काळ्या रंगाला संक्रातीत मात्र मानाचे स्थान आहे.
Makar Sankranti Festival Importance Black Cloths