गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वीजबिलात नोव्हेंबरमध्ये ५९० कोटीची तूट; वसुलीबाबत दिले हे निर्देश

डिसेंबर 11, 2021 | 7:35 pm
in स्थानिक बातम्या
0
Photo01

 

नाशिक – वितरीत केलेल्या विजेच्या किंमतीचा परतावा वेळेत मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणपुढील अडचणी आणखी वाढत आहेत. थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान समोर असताना महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात नोव्हेंबर महिन्याचे चालू वीजबिलही (करंट डिमांड) पूर्ण वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे वसुलीच्या कामाला गती देऊन किमान वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सक्त निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) प्रसाद रेशमे यांनी दिले आहेत.

कोकण प्रादेशिक विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता व त्याअंतर्गत पेण, ठाणे, वाशी, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंता यांच्या समवेत कल्याण परिमंडल कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. महावितरणच्या एकूण महसुलात ४० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देणाऱ्या कोकण प्रादेशिक विभागाच्या वसुलीत दरमहा राहणारी तफावत महावितरणच्या बिकट आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारी ठरत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून वसुलीच्या कामाला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण केले तर आणि तरच महावितरण टिकू शकणार असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) रेशमे यांनी स्पष्ट केले. कोकण प्रादेशिक विभागात सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून नोव्हेंबर-२०२१ या महिन्यात चालू वीजबिलाचे ३ हजार १०७ कोटी रुपये वसूल होणे आवश्यक होते. मात्र चालू वीजबिलाच्या वसुलीत तब्बल ५९० कोटी रुपयांची तूट आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या निर्धारित उद्दिष्टापेक्षा ही वसुली १ हजार ३३६ कोटी रुपयाने कमी आहे.

कोकण प्रादेशिक विभागात एकूण थकबाकी व नोव्हेंबरचे चालू वीजबिल लक्षात घेता कृषिपंप ग्राहक वगळता वितरित केलेल्या विजेची वसुली योग्य रक्कम ५ हजार ७३४ कोटी रुपये आहे. तर कृषिपंप ग्राहकांकडून सप्टेंबर २०२० पासूनचे १ हजार ६७२ कोटी रुपये चालू वीजबिल आणि कृषी धोरण-२०२० योजनेंतर्गत ५० टक्के सवलतीशिवाय ४ हजार ४०४ कोटी रुपयांची थकबाकी वसुली अपेक्षित होती. परंतु चालू वीजबिलाचे ६५ कोटी व योजना सुरु झाल्यापासून थकबाकीतील अवघे १९८ कोटी रुपये वसूल होऊ शकले. वसुलीची ही बिकट परिस्थिती पाहता मुख्य कार्यालयाकडून दरमहा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत देण्यात येणाऱ्या यादीतील ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश देतानाच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष देऊन नियमानुसार व वेळेत हे काम पूर्ण करण्यासोबत या कामांची पडताळणी करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) रेशमे यांनी दिले आहेत. याशिवाय अकृषक वीज वापर वाढवणे, वीजहानी कमी करून महसूलात वाढ, शहरी भागातील वीजगळतीचे प्रमाण कमी करणे, योजनेचा लाभ देऊन कृषिपंप ग्राहकांकडून चालू व थकबाकी वसुलीला गती, वीज चोरांवर कडक कारवायांसह वितरीत होणाऱ्या प्रत्येक‍ युनिट विजेचे बिलात रुपांतर व त्याची वसुली करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीला भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, कोकण (रत्नागिरी) परिमंडलाचे मुख्य अभियंता विजय भटकर यांच्यासह सर्व मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंते उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपातर्फे दिव्य काशी, भव्य काशी निमित्ताने राज्यात या ठिकाणी कार्यक्रम

Next Post

CHMEचा प्रथमच महाराष्ट्राबाहेर विस्तार; NDA प्रशिक्षण केंद्र आणि सैनिकी स्कूल सुरू करणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
chme

CHMEचा प्रथमच महाराष्ट्राबाहेर विस्तार; NDA प्रशिक्षण केंद्र आणि सैनिकी स्कूल सुरू करणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011