इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शहरात उद्या गुरुवार २९ मे रोजी सकाळी ९.३० ते १.०० वाजेपर्यंत शालीमार उपकेंद्रातील ११ केव्ही राजे बहादूर वाहिनीवरील वीज पुरवठा देखभाल दुरुस्ती कामांसाठी बंद राहणार आहे.
यामध्ये राजे बहाद्दर लेन, फावडे लेन,चांदवडकर लेन, महात्मा गांधी रोड, वकील वाडी ,घणकर लेन, रेडक्रॉस आणि देवधर लेन या भागाचा समावेश आहे. कृपया ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.