मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ८ महिन्यातच राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यातून फक्त शिवरायांचा अवमानच नाही तर, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लागली. असे सांगत महाविकास आघाडीतर्फे आज सकाळी १० वाजता महाराष्ट्रद्रोही सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे.
मुंबईत हुतात्मा स्मारकापासून हे आंदोलन सुरु झाले. त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन हे आंदोलन करण्यात आले. सत्तेचा माज मस्तवाल लोकांच्या डोक्यात गेला आहे असेही यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.