शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – डहाणू रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास केंद्राची मंजुरी…नाशिक जिल्ह्याला असा फायदा

by India Darpan
सप्टेंबर 1, 2024 | 7:13 pm
in संमिश्र वार्ता
0
railway 111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जानेवारी २०२४ मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे भारत-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत नाशिक – त्र्यंबकेश्वर – वाणगाव वाढवण पोर्ट बीजी रेल्वेला मंजुरी देण्याची केली होती. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठ यश मिळालं असून नाशिक डहाणू रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास केंद्राची मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातला अधिक फायदा होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातला धार्मिक, ऐतिहासिक व कृषी क्षेत्राच्या दृष्टीने विशेष असे महत्त्व आहे. त्यादृष्टीने भारत-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत नाशिक – त्र्यंबकेश्वर – वाणगाव वाढवण पोर्ट बीजी रेल्वेला मंजुरी देण्याची मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना १८ जून २०२४ रोजी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. तसेच याबाबत मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा देखील सुरू होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी वाढवण बंदराला राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली होती. या बंदराचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या बंदराला जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नाशिक डहाणू रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

नाशिक ते डहाणू रेल्वेमार्गाच्या १०० किलोमीटरच्या या लाईनमुळे दोन महत्त्वाच्या ठिकाणांची कनेक्टिव्हिटीत मोठी वाढ होणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या देखील हा प्रकल्प अतिशय फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीसारख्या धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना या रेल्वे मार्गामुळे सहज पोहचता येणे शक्य होणार असून प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे.

विशेषतः नाशिक जिल्हा हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतमाल वाढवण बंदरापर्यंत पोहचणे अधिक सुलभ होऊन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच शेतमालासह सर्व प्रकारच्या औद्योगिक उत्पादनांच्या आयात निर्यातीस चालना मिळून राज्याच्या आर्थिक विकासात मोठी भर पडणार आहे.

त्याचबरोबर नाशिक वाढवण पोर्ट बीजी रेल्वे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि जव्हार, मोखाडा या महत्त्वाकांक्षी पालघर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्याला सामाजिक आर्थिक लाभ वाढविण्याकरिता जोडले जाऊन या भागाचा अधिक विकास यामुळे होणार आहे.

नाशिक-वाढवण पोर्ट रेल्वे मार्गास मंजुरी मिळाल्यानंतर कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आपल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड ड्राय पोर्ट देखील मुंबई जेएनपीटीसोबतच वाढवण पोर्टशी जोडला जाणे आवश्यक आहे. त्यामुळे निफाड ड्रायपोर्टचा वाढवण पोर्ट नियोजनात समावेश करून घेण्यासाठी देखील आपण आग्रही असणार आहोत. जेणेकरून निफाड पोर्ट येथे रेल्वे कंटेनर कस्टम क्लिअरन्स करून थेट वाढवण पोर्ट येथून निर्यात करतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Live: मुंबईत महाविकास आघाडीतर्फे आंदोलन…(बघा व्हिडिओ)

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई…विदेशी मद्यासह ७६ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
IMG 20240901 WA0268 e1725198462773

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई…विदेशी मद्यासह ७६ लाखाचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011